वाशिम प्रतिनिधी —
वरिष्ठांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वाशिम जिल्हा कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्षा सौ. कविता परमेश्वर खराट यांनी नुकतीच केली. नव्या संघटनेत अनुभवी कार्यकर्त्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी देत पक्षशक्ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जिल्हा सरचिटणीसपदी सौ. छाया पवार, सौ. अन्नपुर्णा पांडे आणि सौ. माधुरी देशमुख यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. प्रांजली पाध्ये, सौ. रेखा लांडे आणि सौ. गोदावरी जाधव यांची नियुक्ती झाली. चिटणीसपदी सौ. कल्पना खामकर, सौ. राधा नकले, कु. भावना सरनाईक आणि सौ. सुनिता ढवळे यांचा समावेश आहे. कोषाध्यक्षपदी सौ. कविता मालपाणी यांची निवड झाली.
डिजिटल माध्यमांतून संघटनाला गती देण्यासाठी जिल्हा सोशल मिडीया प्रमुखपदी सौ. वनमाला ढगे यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सौ. किरण देव, सौ. इंदिरा बरेटी, सौ. दिपाली इंगळे, सौ. तृप्ती गायकवाड, सौ. निता राठोड, सौ. चंद्रकला चव्हाण, सौ. वनिता भोंडसे, सौ. श्रद्धा देशमुख, सौ. तृप्ती दुतोंडे, सौ. किर्ती शिवपुरे, सौ. लता मलीक, सौ. संगीता राऊत, सौ. शुभांगी देशमुख, सौ. बेबी खडसे, सौ. ममता शर्मा, सौ. लक्ष्मी शिंदे, सौ. सयाताई चव्हाण, सौ. गंगाताई राठोड, सौ. गणाबाई राठोड, सौ. संध्या सरनाईक, सौ. रजनी राऊत, सौ. माधुरी नेतन्सकर, सौ. अर्चना खोरणे, सौ. शकुंतला मुखमाले आणि सौ. दिपाली खोरणे यांची निवड झाली.
जिल्हा कार्यकारिणीच्या या नव्या संघटनेत विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा सहभाग असून, पक्षाच्या महिला आघाडीला ग्रामीण-शहरी पातळीवर नवा जोम मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्षा सौ. खराट यांनी व्यक्त केला.
____________________________
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी भ्रष्टाचार विरोधी समाज परिवर्तनाचे मराठी न्यूज चॅनल प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर वाशिम खबर बातम्या साठी संपर्क करा 94 21 15 11 73
0 Comments