Ticker

6/recent/ticker-posts

‘हर घर तिरंगा’ व रक्षाबंधन उपक्रमाने राष्ट्रभक्तीचा जागर – भाजपा तालुका कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक उत्साहात संपन्न


वाशिम  | आगामी स्वातंत्र्य दिनानिमित्त 'हर घर तिरंगा' या राष्ट्रीय अभियानाला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुकास्तरावर भव्य नियोजन बैठक पार पडली.


या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष मा.  पुरुषोत्तम भाऊ चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. कविताताई खराट यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.

‘हर घर तिरंगा’ अभियानाचे संयोजक श्री. सुभाषजी नानवटे यांनी संपूर्ण मोहिमेची माहिती देत कार्यकर्त्यांना यामध्ये सक्रीय सहभागाचे आवाहन केले.

कार्यक्रमास तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील कड, तालुका सरचिटणीस जगदीशजी देशमुख, राजेशजी घुले, माजी तालुकाध्यक्ष प्रल्हादजी गोरे, राहुलजी शिंदे, तसेच तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे उद्दिष्ट, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविणे, घरोघरी जाऊन जनजागृती करणे, रक्षाबंधनाच्या माध्यमातून सामाजिक बंध सुदृढ करणे, यावर सविस्तर चर्चा झाली.

सर्व मान्यवरांनी आपापले मार्गदर्शन करत या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रसेवेच्या कार्यात तत्पर असल्याचे प्रतिपादन केले.


🌷 राष्ट्रासाठी एकत्र येऊया, घराघरात तिरंगा फडकवूया! 🇮🇳


वाशिम खबर आज महाराष्ट्राची संपादक सुधाकर चौधरी 

बातम्यासाठी संपर्क 9421151173

Post a Comment

0 Comments