मुंबई, दि. ६ (सुधाकर चौधरी संपादक)
: वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ज्येष्ठ नेते मा. दत्तामामा भरणे यांची महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आज माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांनी मुंबई येथील मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी ठाकरे साहेबांनी भरणे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्याच्या कृषी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्याची क्षमता भरणे यांच्यात असून, त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासावर सदिच्छापूर्ण चर्चा झाली. वाशिम जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी भरणे यांच्या मंत्रिपदाचा निश्चितच सकारात्मक फायदा होईल, असा विश्वास या भेटीतून व्यक्त झाला. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारा, त्यांच्यातला नेता आता थेट कृषी विभागाच्या केंद्रस्थानी आला आहे, ही बाब संपूर्ण राज्यासाठी अत्यंत आश्वासक असल्याचे ठाकरे साहेबांनी सांगितले.
राज्याच्या कृषी विकासासाठी तसेच वाशिम जिल्ह्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दत्तामामा भरणे हे कार्यकुशल, लोकसंग्रही व निर्णयक्षम नेतृत्व म्हणून राज्यात परिचित असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेती आणि शेतकरी प्रश्नांना नवे वळण मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
0 Comments