Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त मंगरूळपीरमध्ये अभिवादन सोहळा


“अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर”


विचारांची उजळणी... वारशाला उजाळा... समाज परिवर्तनासाठी प्रेरणादायी कार्यक्रम


(संपादक सुधाकर चौधरी)

मंगरूळपीर 

“क्रांतीच्या मशाली त्यांनी पेटवल्या, शब्दांच्या अंगारांनी समाज जागवला...”
अशा शब्दांत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मंगरूळपीर येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आदरांजली अर्पण करण्यात आली.


प्रगती समुपदेशन केंद्र, शिवरत्न महिला मंडळ आणि गोरोबाकाका महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमाला ताई पेंढारकर होत्या. त्या म्हणाल्या, “अण्णाभाऊ साठे हे वंचित, श्रमिक, दलितांच्या वेदनांना आवाज देणारे थोर साहित्यिक होते. त्यांच्या लेखणीने परिवर्तनाच्या चळवळींना बळ दिलं. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा नारा देत स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली. हे दोघंही आपल्यासाठी प्रेरणेचे स्रोत आहेत.”

ज्ञानेश्वर राठोड (एकात्मिक बाल विकास प्रकल्प लिपिक), बंडू भगत (राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त), पुनम भगत (संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी, वाशिम), अतिश राठोड, बबन नेरकर, तात्याराव मनोहर, मुकेश भोंडणे, किशोर उंद्रे, राठोड भाऊ, यमुना वेलखेडे, यश पेंढारकर, दीक्षा बेलखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू भगत यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन यश पेंढारकर यांनी केले.


Post a Comment

0 Comments