Ticker

6/recent/ticker-posts

मजुरांनो, तुमच्यासाठीच ही सुवर्णसंधी!



महायुतीच्या पुढाकारातून – कामगार कल्याण मंडळाच्या २८ योजना तुमच्या दारी

मंगरूळपीर (वार्ताहर) :
घाम गाळून, विटा-रेती उचलून, उन्हाळा-थंडी-वारं सहन करून बांधकाम उभं करणारा मजूर हा समाजाचा खरी ताकद आहे. पण त्याचं जीवन अनेकदा अडचणीत जातं. अशा बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने तब्बल २८ कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक मजुरापर्यंत पोहोचावा यासाठी महायुतीच्या पुढाकारातून आवाहन करण्यात आलं आहे.

आमदार मा. श्यामभाऊ खोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक सरपंच, समाजसेवक, महिला कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने आता प्रत्येक मजुरापर्यंत कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्याचं काम सुरू आहे.

योजनांचा लाभ कोणता?

मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत, प्रसूती सहाय्य, वैद्यकीय उपचारासाठी मदत, अपघात विमा, निवृत्तीवेतन अशा अनेक सुविधा या योजनांतून मिळणार आहेत.

नोंदणी कशी करायची?

१८ ते ६० वयोगटातील मजुरांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना खालील कागदपत्रे लागतील :

  • स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
  • बांधकाम मजुराचा पासपोर्ट फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • राशन कार्ड
  • पॅनकार्ड / शाळा सोडल्याचा दाखला
  • मागील वर्षभरात किमान ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मजुराला स्मार्ट कार्ड दिलं जाईल. त्याचं नुतनीकरण दरवर्षी करणं बंधनकारक आहे.

संपर्क साधा – लाभ घ्या

या मोहिमेत सौ. सुनिताताई खिराडे (सरपंच सोनखास शहापुर), नूतन राठोड (महिला जिल्हाध्यक्ष), सौ. सुनिता वानखडे (समाजसेविका), श्री. गोपाल पाटील लुंगे (सरपंच पास्वा), श्री. चंद्रकांत पाटील देवळे (जनसेवक), रबि पाटील राऊत (रा. काँ. उपाध्यक्ष), विनोद पाटील, नंदकिशोर पाटील आदींचा सक्रिय सहभाग आहे.

नोंदणीसाठी इच्छुकांनी संपर्क साधावा :
📞 सौ. ज्योतीताई ठाकरे – 9604013440
(संचालिका, जिनिंग प्रेसिंग, मंगरूळपीर तथा वाशिम)


👉 

Post a Comment

0 Comments