Ticker

6/recent/ticker-posts

अमरावती विभाग पदाधिकारी बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले!


अमरावती – स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांचे रणशिंग आता अधिकृतपणे वाजले असून, अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांची भव्य बैठक उत्साहात व जल्लोषात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शक मान्यवर म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, उपनेते राहुल शेवाळे साहेब, तसेच पक्षाचे सचिव संजय मोरे साहेबभाऊसाहेब चौधरी साहेब उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या अंगात विजयी जोम भरून गेले.


मान्यवरांनी भाषणातून निवडणुकीच्या रणांगणातील धोरण, जनतेपर्यंत पोहोचण्याचे डावपेच, आणि एकदिलाने लढण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “पक्षाचा झेंडा प्रत्येक गावाच्या चौकात फडकला पाहिजे” असा विजयी हुंकार सभागृहात घुमला.

बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील महत्त्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात घोषणांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील विजयाचा तेजोमय आत्मविश्वास पाहून निवडणुकीच्या लढाईची चाहूल सर्वदूर पसरली.


Post a Comment

0 Comments