Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीय प्रकाश दादा डहाके पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


कारंजा तालुक्याचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतो तो नृसिंह महाराजांचा गुरु मंदिर. भक्तिभावाने ओथंबलेल्या या पवित्र भूमीतूनच समाजाला दिशा देणारं एक थोर व्यक्तिमत्त्व घडलं – स्वर्गीय प्रकाश दादा डहाके.

दादांनी केलेलं राजकारण हे नुसतं सत्तेसाठी नव्हतं. त्यांनी राजकारणाची परिभाषाच बदलून दाखवली. कित्येक राजकारणांना धुळीस मिसळून, निळबळपणे, ठामपणे आणि श्रद्धेने त्यांनी आपली राजकीय वाटचाल केली. त्यांच्या प्रामाणिकपणासमोर स्वार्थी राजकारणाचे मुखवटे आपोआप गळून पडत.

आजही कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत जेव्हा एखादा शेतकरी पाऊल ठेवतो, तेव्हा त्याला दादांची आठवण येते, आणि त्यांची अनुभूती मनोमन जाणवते. कारण त्या बाजार समितीच्या भिंतींवर, अंगणात, व्यापाऱ्यांच्या बोलण्यात आणि शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबांत दादांचे अस्तित्व जिवंत आहे.

दादांनी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला आपलं मानलं. विरोधकांच्या डोळ्यांत डोळे घालून त्यांनी आपली बाजू मांडली, पण त्याचबरोबर सामान्य जनतेच्या डोळ्यांतलं पाणीही पुसलं. म्हणूनच आजही जनता त्यांना विसरत नाही.

हीच पुण्याई आहे की दादांच्या धर्मपत्नी, सौ. सई ताई प्रकाश दादा डहाके, आज कारंजा–मानोरा मतदारसंघाच्या आमदार आहेत. जनतेनं दिलेला हा विजय हा केवळ सई ताईंचा नव्हे, तर दादांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचा, प्रामाणिकपणाचा आणि सेवाभावाचा पुरावा आहे.

आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ठामपणे सांगू शकतो –
राजकारणात पदं मिळवणारे शेकडो, पण जनतेच्या मनात सिंहासन मिळवणारे फार थोडे!
प्रकाश दादा डहाके हे त्यापैकीच एक थोर व्यक्तिमत्त्व होतं.

🙏 दादांना कोटी कोटी अभिवादन

 🙏सिंहासन नव्हे, जनतेची मने जिंकली, प्रकाश दादांनी वाटचाल श्रद्धेची केली। आजही मनांत त्यांच्या कार्याची ज्योत, कोटी कोटी अभिवादन, अमर राहो ते नाव ॥


जनतेसाठी आयुष्य वाहून गेले, सत्य, सेवेत दादांचे पाऊल ठसे उमटले।पुण्यतिथी निमित्त मनांत एकच भाव, अमर राहो दादांचे स्मरण अनंत काळ ॥


🌹 भावपूर्वक श्रद्धांजली 🌹

कारंजा तालुक्याच्या पावन मातीतून उगम पावलेलं तेजस्वी व्यक्तिमत्त्व,
शेतकऱ्यांच्या घामाला, जनतेच्या दुःखाला आणि समाजाच्या प्रत्येक हाकेला उत्तर देणारं नाव – 

स्वर्गीय प्रकाश दादा डहाके यांच्या पावन स्मृतीस
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र परिवारातर्फे
भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र आदरांजली
🌹

सुधाकर चौधरी, संपादक
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र



Post a Comment

0 Comments