Ticker

6/recent/ticker-posts

रायसोनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकतेचा आदर्श घडवला

'एकाक्षरा' गणेशोत्सवातून दिला सामाजिक संदेश



अमरावती – अनिता यादव

जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी ‘एकाक्षरा’ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत राष्ट्रीय एकतेचा आदर्श घालून दिला. या निमित्ताने धार्मिकतेबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे समाजाला सकारात्मक संदेश मिळाला.

विद्यार्थ्यांनी गणेशमूर्तीची स्थापना करताना इको-फ्रेंडली मूर्तीचा स्वीकार करून पर्यावरण संरक्षणाचे भान जपले. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या सहयोगाने “मोदक बनवा” स्पर्धा घेण्यात आली. तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव दृढ करण्यासाठी ‘गणेशोत्सव आणि आजचा युवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. बीसीए अंतिम वर्षाचा विद्यार्थी आयुष पवार याने प्रभावी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना ऊर्जावान बनवले.


रक्तदान शिबिरातून दिला “महादान”चा संदेश

रक्तदान हेच महादान” हा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यापीठातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.

मान्यवरांचे उद्गार

या उपक्रमाचे कौतुक करत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले –
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षणासोबत जर विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमधून समाजाशी बांधिलकी ठेवली, तर ते निश्चितच आदर्श नागरिक बनू शकतात.”

विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांनी भावना व्यक्त करत सांगितले –
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली ही पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून विद्यापीठाच्या गौरवात भर टाकणारी आहे.”

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल यांनी सांगितले –
“विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करणे हे आमचे ध्येय आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिक जाणीवेतही समृद्ध होतात.”

कार्यक्रमाचे संचालन

संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संचालन स्पोर्ट्स ऑफिसर डॉ. अमर मोरे यांनी केले.


Post a Comment

0 Comments