Ticker

6/recent/ticker-posts

श्री गुरुकृपा भजनी मंडळाचे विविध गणेश मंडळात भजन सादरीकरण

 (पवन राठी शेलुबाजार)

शेलुबाजार

तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक खंजिरी भजनी मंडळांची समृद्ध परंपरा टिकून आहे. समाजामध्ये थोर महापुरुषांचे विचार पोहोचविण्याचे तसेच भक्तिमय वातावरण निर्मितीचे कार्य या भजनी मंडळाच्या माध्यमातून सातत्याने होत असते.

सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवानिमित्त कंझरा येथील श्री गुरुकृपा खंजिरी भजनी मंडळातर्फे विविध गणेश मंडळांसमोर भजनी सादरीकरण करण्यात येत आहे. मंडळाच्या भक्तिमय गायनामुळे परिसरात उत्सवी जल्लोषाबरोबरच अध्यात्मिक वातावरणही अनुभवायला मिळत आहे.

या भजनी मंडळात हार्मोनियम वादक प्रकाश हरणे, तबलावादक सारंग हरणे यांच्यासह गायक विश्वनाथ इंगोले, दयाराम मोहरकार, नारायण इंगळे, सचिन गावंडे, बंडूभाऊ कराळे, पुष्पाबाई ठाकरे आणि राधाबाई गावंडे यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.

थोर पुरुषांचे विचार, भक्तिरस आणि समाजात प्रेरणा जागविणारे संदेश या मंडळाच्या भजनातून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत असून ग्रामीण भागात सांस्कृतिक चैतन्य जागृत ठेवण्याचे कार्य मंडळ सातत्याने करीत आहे.


Post a Comment

0 Comments