मंगरूळपीर, ता. ४ सप्टेंबर – श्री मो.ठा. शिक्षण प्रसार मंडळ, कासोळा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात सत्र २०२५-२६ करिता गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वसंमतीने गठित करण्यात आली.
गठन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरद वाघोळे (कला शाखा सुपरवायझर) उपस्थित होते. यावेळी गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख व मंडळ समन्वयक प्रा. सुषमा जाजू यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास मंडळाचे उद्दिष्ट पटवून सांगितले. त्या म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य तसेच सुप्त प्रतिभेला व्यासपीठ मिळावे या हेतूने अभ्यास मंडळाचे गठन करण्यात येते. आगामी सत्रात गटचर्चा, सेमिनार, क्षेत्रभेटी, पोस्टर प्रेझेंटेशन, कार्यशाळा, प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.”
यानंतर डॉ. वाघोळे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
नव्या कार्यकारिणीची निवड
सत्र २०२५-२६ साठी बी.ए. भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांची निवड करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
- अध्यक्ष : साक्षी भगत (बी.ए. भाग ३)
- सचिव : निकिता भगत
- उपाध्यक्ष : वैष्णवी ठाकरे
- सहसचिव : दिव्या धनगीकर
- कोषाध्यक्ष : सानिका खिराडे
- सहकोषाध्यक्ष : ज्ञानेश्वरी खिल्लारी
- सल्लागार : चैताली पाकधने
- सहसल्लागार : पूजा अंभोरे
- प्रसिद्धी प्रमुख : पुनम शिरसाट
- सहप्रसिद्धी प्रमुख : पायल भोयर
तसेच अंजली हिसेकर, नेहा पवार, निकिता देवळे, स्वाती दहातोंडे, मीनाक्षी तायडे, आकांक्षा चव्हाण, प्रणाली इंगोले, समृद्धी भगत, ज्ञानेश्वरी गव्हाणे, भाविका महल्ले, शितल वानखडे, मुक्ता जाधव, शीतल राऊत, शिवानी मोरे, गौरी ठाकूर, अश्विनी लहाने, भक्ती सुर्वे, प्रज्ञा भगत, कल्याणी पाकधने, अनामिका इंगोले आदींना सदस्य म्हणून निवडण्यात आले.
मान्यवरांची प्रेरणा व मार्गदर्शन
संस्थेचे सचिव चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ. कान्हेरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी ठाकरे यांनी केले तर आभारप्रदर्शन साक्षी भगत यांनी मानले. सर्व नूतन कार्यकारिणी सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात उत्साहाचे आणि नवी उमेद जागवणारे चित्र दिसत होते.
✍️ समन्वयक – प्रा. सौ. सुषमा एस. जाजू, गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ
0 Comments