मंगरुळपीर तालुक्यातील सोमनाथ पंचवटी गणेशोत्सव मंडळात गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. या मंगलप्रसंगी माननीय आमदार श्यामभाऊ खोडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून गणरायाचे पूजन केले. पूजनानंतर गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप करून आनंद व समाधानाचा सोहळा रंगला.
याप्रसंगी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावकरी, स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्वांनीच भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुनिता ललित पाटील अनेकर,
सुरेश पाटील, जुगल भाऊ बियाणी, अशोक भाऊ परळीकर ,भास्कर भाऊ मुळे, आदित्य ललित पाटील, गुजरे, गिरडेकर, राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले. स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने पुढाकार घेतल्याने मंडळाचा सोहळा अधिकच थोर झाला.
गणरायाच्या कृपेने गावकुसात भक्ती, ऐक्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावच्या आराध्य दैवताच्या छायेखाली, एकत्र बसून महाप्रसाद घेणे – ही खरी खरी पुण्याई!
0 Comments