महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी!
चार वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार – पोलीस मित्र संघटना आणि महिला आघाडीची ‘फाशीची’ ठाम मागणी
मंगरूळपीर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या कु. यजा दुसाने हिच्यावर निर्घृण अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र संतापाने पेटून उठला आहे. समाजाला हादरवून टाकणाऱ्या या अमानुष कृत्यावर देशभरातून संतापाची लाट उसळली असून, “या नराधमाला फक्त आणि फक्त फाशीच!” अशी एकमुखी मागणी होत आहे.
मंगरूळपीर पोलीस स्टेशनला निवेदन — “ही लढाई न्यायाची!”
सौ. ज्योतीताई मनोज ठाकरे, निरीक्षक—वाशिम जिल्हा महिला आघाडी यांच्या नेतृत्वात पोलीस मित्र संघटना, मानवाधिकार समिती आणि विविध महिला संघटनांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनवर धडक देत जाहीर निवेदन सादर केले.
“चार वर्षांच्या चिमुकलीवरचे हे अत्यंत क्रूर कृत्य मानवतेलाच काळं पांघरून टाकणारं आहे. दोषीला त्वरित अटक, जलद तपास आणि थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी संतप्त मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन – “न्याय तात्काळ मिळालाच पाहिजे!”
संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य प्रशासनाला थेट इशारा देत म्हटलं आहे—
“आम्हाला न्याय हवा… आणि तोही ताबडतोब! विलंब सहन केला जाणार नाही.”
गुन्हेगारावर जलदगतीने आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालयात खटला चालवण्याची मागणी ठामपणे नोंदवण्यात आली.
मानवाधिकार समितीचा कडक शब्दात निषेध — “असा राक्षस समाजात राहूच नये!”
समितीने निवेदनात स्पष्ट म्हटलं—
“चार वर्षांच्या देवदूतासारख्या बालिकेवर इतका पाशवी अत्याचार करणारा नराधम जिवंत राहण्यालाही पात्र नाही. त्याला थेट फाशीच हवी!”
मुख्य मागण्या :
- ✔ शिघ्रगती तपास व तात्काळ आरोपपत्र
- ✔ विशेष न्यायालयात खटला व फाशीची शिक्षा
- ✔ अॅड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
- ✔ पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत
महिला कार्यकर्त्यांचा संताप — “न्याय न झाल्यास रस्त्यावर उतरू!”
ज्योतीताई ठाकरे यांच्या नेतृत्वात आश्विनी वाध, वर्षा जावळे, जयश्री पाटील, रेखा पाटील, सुरेखा ठाकरे, मीना बगाळे या महिला कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर संतप्त घोषणांनी अक्षरशः थरकाप उडवला.
महिलांचा इशारा—
“दोषीला शिक्षा झाली नाही तर आमचा लढा अधिक आक्रमक होईल!”
गावात भीतीचं सावट – राज्यभर संतापाची लाट
डोंगराळे गावातील नागरिक धास्तावले असून संपूर्ण राज्यात रोष उसळला आहे.
“हे केवळ एका मुलीचं प्रकरण नाही… ही संपूर्ण मानवतेवरील जखम आहे!” असे जनतेचे स्वर आहे.
जनतेचा प्रशासनाला कडक इशारा :
“न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र शांत बसणार नाही!”
0 Comments