तऱ्हाळा येथे 28 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी हनुमान संस्थान येथे लहान उद्योजक, व्यापारी व ग्रामस्थांची भव्य बैठक आयोजित करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून गावात चालू असलेल्या आठवडी बाजार स्थापनेच्या चर्चेला या बैठकीत सकारात्मक दिशा मिळाली. गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याच्या उद्देशाने दिनांक 14 डिसेंबर 2025 पासून प्रत्येक रविवारी दुपारी 2 नंतर आठवडी बाजार (गुजरी) सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला.
गावाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
तऱ्हाळा गावासोबतच पांगरी, मासोला, पिंपळखुटा, पेडगाव तपोवन, पुंजाजी नगर या परिसरातील गावकऱ्यांना सहज उपलब्ध बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांचे भाजीपाला व फळांना योग्य दर मिळावा आणि गावात आर्थिक देवाणघेवाण वाढावी या हेतूने या उपक्रमाची संकल्पना राबविण्यात आली. या कल्पनेला सर्व उपस्थितांचा मोठा पाठिंबा मिळाला.
बैठकीत ठरलेले महत्त्वाचे नियम
गावात सुव्यवस्थित, सुरक्षित आणि स्वच्छ बाजारपेठ उभी राहावी यासाठी व्यापारी, ग्राहक आणि समिती सदस्यांच्या चर्चेतून पुढील नियम निश्चित करण्यात आले—
- दारू आणि मांस विक्रीस सक्त मनाई.
- पाणी व विद्युतपुरवठा ग्रामपंचायतीमार्फत.
- व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकान परिसराची स्वच्छता राखणे बंधनकारक.
- वादविवाद न करता शांततेत व्यापार करणे.
- प्रत्येकाने घनकचरा ठरवलेल्या जागीच टाकणे.
- बाजाराचा टॅक्स नवीन वर्षापासून लागू.
- वनविभागाच्या जागेवर तसेच बसस्टँड परिसरात योग्य ठिकाणी बाजार मांडणी.
- कारंजा रोडवरील वाहतूक लक्षात घेऊन सुरक्षित बाजारव्यवस्था.
- आजूबाजूच्या गावांतील व्यापारी व ग्राहकांना प्राधान्य – चुकीची विक्री पूर्णतः बंद.
- ग्राहक व व्यापाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता न्यायव्यवस्था समितीची नेमणूक.
प्रचार–प्रसाराचा मोठा कार्यक्रम
ग्रामपंचायत व आठवडी बाजार समन्वय समिती यांच्या माध्यमातून
बॅनर, पंपलेट, दवंडी व भेट मोहीम यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे.
उपस्थित मान्यवर
या महत्वपूर्ण बैठकीला किशोर देशमुख, सागर म्हैसने, श्रीकृष्ण गावंडे, बाळू गोविंदराव कराळे, रमेश जागृत, दौलत भगत, चैतन शिंदे, नकुल गावंडे, मदन गायकवाड, कयूम शे., गजानन पोफळे, शेख इरफान, संतोष गावडे, अरुण लिंगाडे, अभिजित गावंडे, विनोद चाबुकस्वार, गणेश आगळे, किसना पाकदाणे, निलेश वाघमारे, शैलेश सावळे, निलेश देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
तऱ्हाळा गावाची नवी ओळख – “आर्थिक भरभराटीच्या दिशेने मोठी झेप”
14 डिसेंबर 2025, रविवार – तऱ्हाळा आठवडी बाजार ग्रँड ओपनिंग!
हा उपक्रम गावाच्या प्रगतीला, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि लहान व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देईल, असा सर्वांनी विश्वास व्यक्त केला
0 Comments