Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर नगरपरिषद निकाल जाहीर — नगराध्यक्षपद राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे, भाजप नगरसेवक संख्येत आघाडीवर

गड आला पण सिंह गेला


मंगरूळपीर  (सुधाकर चौधरी)
मंगरूळपीर नगरपरिषद निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षपदी (अजित पवार गट) चे उमेदवार अशोक परळीकर यांनी निर्णायक विजय मिळवत नगराध्यक्षपदावर झेंडा फडकावला. मात्र, नगरसेवक संख्येत सर्वाधिक जागांसह आघाडीवर राहिल्याने आगामी सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


🔴 नगराध्यक्षपदाचा निकाल

  • अशोक परळीकर (राष्ट्रवादी – अजित पवार)
    👉 एकूण मते : 9,044
    👉 4,490 मतांनी विजयी
  • डॉ. दिलीप रत्नपारखी (भाजप)
    👉 एकूण मते : 4,554
    👉 4,490 मतांनी पराभव

अशोक परळीकर यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) गटात उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, घोषणा देत व विजय रॅली काढून जल्लोष साजरा केला.


मंगरूळपीर नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार

प्रभाग 01

  • लातबाई चितलांगे – भाजप : 944
  • अनिल गावंडे – भाजप : 1,094

प्रभाग 02

  • फैसल खान शफी खान – अपक्ष : 736
  • सायराबानो जा. शब्बीर खान – राष्ट्रवादी (अजित पवार) : 978

प्रभाग 03

  • बिलाल अहमद अब्दुल अखिल – अपक्ष : 529
  • शबाना परविन मिर्झा अझहर – काँग्रेस : 824

प्रभाग 04

  • शेरबानो मोहम्मद जमीर कुरेशी – राष्ट्रवादी (अजित पवार) : 1,186
  • नसीम परविन लतीफ खान – राष्ट्रवादी (अजित पवार) : 1,015

प्रभाग 05

  • साहेल खादीजा अब्दुल वाहिद – MIM : 894
  • फरहाना परविन आसिम खान – अपक्ष : 847

प्रभाग 06

  • सपना गणेश बजाज – शिवसेना (शिंदे) : 552
  • सुधीर घोडचर – भाजप : 542

प्रभाग 07

  • प्रतिमा भोजने – भाजप : 661
  • विरेंद्रसिंह ठाकूर – भाजप : 582

प्रभाग 08

  • किरणताई अशोक परळीकर – राष्ट्रवादी (अजित पवार) : 1,009
  • श्रीहरी इंगोले – भाजप : 777

प्रभाग 09

  • रुपाली मनोज खोडे – भाजप : 1,073
  • राजु नंदलाल जयस्वाल – भाजप : 1,026

प्रभाग 10

  • गणेश खोडे – भाजप : 1,038
  • वैशाली संदीप हरिहर – राष्ट्रवादी (अजित पवार) : 1,080
  • आशाबाई पवार – भाजप : 914


पक्षनिहाय विजयी नगरसेवक संख्या

  • भाजप : 10
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : 05
  • काँग्रेस : 01
  • MIM : 01
  • शिवसेना (शिंदे) : 01
  • अपक्ष : 03

    राजकीय चित्र

नगराध्यक्षपद राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे गेले असले, तरी नगरपरिषदेत नगरसेवक संख्येत भाजपची आघाडी स्पष्ट आहे. त्यामुळे “राष्ट्रवादीचा गळ आला, पण सिंह गेला” अशी राजकीय चर्चा रंगत असून, दहा भाजप नगरसेवक विजयी ठरले असताना नगराध्यक्षपद कार्यकर्त्यांच्या धुवाधार प्रचारानंतरही हातातून निसटले अशी प्रतिक्रिया ऐकू येत आहे. आगामी काळात सत्तास्थापना, विकासकामे व परस्पर सहकार्याच्या भूमिकांवर नगरपरिषदेचे राजकारण अवलंबून राहणार आहे.


मंगरूळपीरच्या राजकारणातील प्रत्येक घडामोडीसाठी वाचा — तुमचा विश्वासू वृत्तस्रोत
वाशिम खबर | आवाज महाराष्ट्राचा


Post a Comment

0 Comments