एन. स्टुडिओ कर्जत येथे २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान भव्य सांस्कृतिक कार्निव्हल
आज मुंबईत पत्रकार परिषद – सविस्तर माहिती सादर
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने कर्जत (खालापूर) येथील एन. स्टुडिओ येथे दिनांक २५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत भव्य आणि आकर्षक सांस्कृतिक कार्निव्हल आयोजित करण्यात येत आहे.
या कार्निव्हलबाबतची सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी आज मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्निव्हलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला, नाट्य, चित्रपट, संगीत, नृत्य तसेच आधुनिक सांस्कृतिक उपक्रमांचे दर्शन घडणार असून कलाकार, रसिक आणि पर्यटकांसाठी हे एक सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रम, सादरीकरणे व विशेष उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
पत्रकार परिषद परिषद सभागृह, चौथा मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार असून, सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे वृत्तांकन करावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
RSVP:
रेश्मा ज्ञाते – ८८७९२११३२६ / ९१५२०००२४१
पंकज चव्हाण – ९७०२२७०८२१
0 Comments