Ticker

6/recent/ticker-posts

एडवोकेट वेदिका कुंडालकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाशिम | प्रतिनिधी
कायदा क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेने व अभ्यासपूर्ण भूमिकेने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या एडवोकेट वेदिका कुंडालकर यांचा वाढदिवस ३ जानेवारी रोजी साजरा होत आहे. त्यांच्या जन्माने कुटुंबीयांच्या आयुष्यात आनंदाची भर पडली असून, आज त्यांच्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीकडे अभिमानाने पाहिले जात आहे.
कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या, मातृत्वाची भूमिका तसेच सामाजिक दायित्वे समर्थपणे सांभाळत असतानाच, त्यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीत सातत्य राखले आहे. संस्कारक्षम कुटुंबातून लाभलेली मूल्यांची शिदोरी आणि आई मीनल ताईंनी दिलेले उत्तम संस्कार यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम व संतुलित बनले आहे.
मुलगी म्हणून त्यांच्या प्रगतीचा कुटुंबीयांना विशेष अभिमान वाटत असून, एक जबाबदार, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ एडवोकेट म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे. त्यांच्या कार्यातून कायदा क्षेत्रात सकारात्मक योगदान लाभत असल्याचेही जाणकारांकडून नमूद केले जात आहे.
वाढदिवसानिमित्त त्यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी उज्ज्वल यश, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
शुभेच्छुक —
वाशिम खबर, आवाज महाराष्ट्राचे संपादक
सुधाकर चौधरी

Post a Comment

0 Comments