Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यशाळा


मंगरूळपीर | सुधाकर चौधरी 

मंगरूळपीर
स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तसेच श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्त्रीमुक्ती चळवळ” या विषयावर डॉ. अनिल बनसोड (आर. ए. कॉलेज, वाशिम) हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेचे उद्घाटन सौ. प्रियाताई चंद्रकांतजी ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शितल निलटकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व स्त्रीमुक्ती चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments