Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदानातून सावित्रीबाई फुलेंना मानवंदना ज्ञानदानाची मशाल रक्तदानातून उजळली


ज्ञानदानाची प्रेरणा, रक्तदानाची कृती!

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगरूळपीर येथील ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका चंचल खेराडे मॅडम यांनी स्वतः रक्तदान करून तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सावित्रीबाईंना जाज्वल्य मानवंदना अर्पण केली.


आपले सर्व रक्त जरी सावित्रीबाई फुलेंच्या चरणी वाहिले, तरीही त्यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत. त्यांनी

स्त्रियांसाठी शिक्षणाचे दार खुले केले, म्हणूनच आज आम्ही सन्मानाच्या व जबाबदारीच्या पदावर आहोत,” असे भावनिक व प्रेरणादायी विचार चंचल खेराडे मॅडम यांनी व्यक्त केले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन ज्ञानकाशी इंग्लिश स्कूल, लायन्स क्लब मंगरूळपीरकायाकल्प फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, युवक-युवती तसेच शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच रक्तपेढीचे वैद्यकीय पथक उपस्थित होते. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सावित्रीबाई फुलेंच्या विचारांना कृतीची जोड देत महिला सक्षमीकरण व सामाजिक जाणीवेचा ठोस संदेश देण्यात आला.

मुख्याध्यापिका चंचल खेराडे मॅडम यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम आदर्श ठरला असून सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत

“शिक्षण दिले सावित्रीबाईंनी — जीवन वाचवतोय रक्तदानाने!”

🙏 या समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका चंचल खेराडे मॅडम तसेच सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन! 🙏


Post a Comment

0 Comments