मंगरूळपीर, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : शहराच्या प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची नवी परंपरा रुजविणारे मंगरूळपीर नगर परिषदेचे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी तथा भारतीय प्रशासन सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी Akash Verma यांचा सोमवारी भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. भाजप व मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने शहरात विकासाभिमुख प्रशासनाचा संदेश दिला.
उपनगराध्यक्ष Anil Bhau Gawande यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि आकाश वर्मा यांच्या प्रतिमेचे तैलचित्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले होते.
यावेळी भाजप गटनेते Ganesh Khode, सर्व समितीचे सभापती प्रा. Virendrasinh Thakur, ॲड. Sudhir Ghodchar, सौ. लता चीतलांगे, सपना बजाज, श्रीमती प्रतिमा भोजने, श्रीमती आशाबाई पवार, सौ. शबाना परवीन अझर मिर्झा, श्रीहरी इंगोले, राजू जयस्वाल, प्रा. नंदलाल पवार, फैजल खान, अझर मिर्झा, उन्मेश भोजने, सचिन पवार, गणेश बजाज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनात आमूलाग्र बदल
अल्पावधीतच शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, प्रलंबित कामांची गती आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्याबद्दल वर्मा यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. नागरिकांशी थेट संवाद, तक्रारींचे तातडीने निराकरण आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता यामुळे नगर परिषद प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
‘विकासाची नवी दिशा’ — अनिलभाऊ गावंडे
उपनगराध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शहराच्या प्रगतीसाठी सक्षम, पारदर्शक आणि दूरदृष्टी असलेले प्रशासन अत्यावश्यक आहे. आकाश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळपीर विकासाच्या नव्या टप्प्यावर पोहोचत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा.”
विकासासाठी प्रशासन-लोकप्रतिनिधी समन्वय
कार्यक्रमात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सत्कार सोहळ्यानंतर उपस्थितांनी वर्मा यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला पुढेही अशीच गती लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरात सकारात्मक बदलांची नवी पहाट उगवत असल्याची भावना या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.
0 Comments