मुंबई : महाराष्ट्रातील योगशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने २०२६-२७ या वर्षासाठी मुंबई जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष खरटमोल यांची फाउंडेशन सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र योगशिक्षक संघ ही राज्यातील योगशिक्षकांसाठी कार्य करणारी महत्त्वाची संस्था असून, योगशिक्षकांना केवळ प्रशिक्षण देणे नव्हे तर त्यांना मार्गदर्शन, प्रमाणपत्रानंतरचे व्यावसायिक नियोजन, योग वर्गांचे नियोजन, फी संरचना तसेच अध्यापन पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्याचे काम संघटना करत आहे. राज्यात तसेच देशात अनेक संस्था योगशिक्षक तयार करतात; मात्र त्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम महाराष्ट्र योगशिक्षक संघ प्रभावीपणे पार पाडत आहे.
संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे योगशिक्षकांच्या हितासाठी विविध मागण्या सातत्याने मांडण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये योग विषयाला मान्यता देणे, प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धनी केंद्रांमार्फत योग सत्र घेणाऱ्या शिक्षकांना नियमित करणे तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये ‘योगा ब्रेक’ सुरू करून त्यासाठी प्रशिक्षित योगतज्ञ नेमणे अशा एकूण १२ महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.
संस्थापक-अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आलेल्या मुंबई जिल्हा कार्यकारणीत अध्यक्षा मनुजा चव्हाण, उपाध्यक्षा हिरा गणवीर, सचिव अमित चिबडे, कोषाध्यक्ष कृष्णकुमार शिंदे, महासचिव रिद्धी देवघरकर, संघटन सचिव दिलीप घाडगे, मीडिया प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे, कार्यालय सचिव प्रभा शेट्टी, जिल्हा महिला प्रकोष्ठ प्रभारी आर्णीका बांदेलकर, लीगल सेल प्रभारी अॅड. माया देसाई, राज्य महिला प्रकोष्ठ प्रभारी सदस्य केशर कुलाबकर, राज्य मार्गदर्शन मंडळ सदस्य साक्षी कलगुटकर यांचा समावेश आहे.
तसेच विशेष सदस्य म्हणून प्रियांका खाडे, कांचन राणे, शालिनी भंडारी, श्वेता पिसाळ, हेमवंता जिजाबाई, प्रशांत मकेसर, निलेश साबळे, विकास ओव्हाळ, रेश्मा धुरी, जयदीप कनकीया, वर्षा शर्मा, वैशाली कराड, सोनल पिंगळे, राखी सोनवणे, सोनाली चव्हाण, ईश्वरी शिंदे, प्रसाद काठे, भारती कावनकर, अनिता अल्वा, भारती जगताप, सुमन नागरे, सुनीता कांबळे, बाळू शिंदे, भानुदास मगदूम, रिना दत्ता, लक्ष्मीबेन गजरा, पार्थ मेहता, प्रियंका भोसले आदींची निवड करण्यात आली आहे.
ही कार्यकारणी संघटनेच्या पुढील कामकाजाला गती देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, योगशिक्षकांच्या हक्कांसाठी आणि सशक्तीकरणासाठी संघटना आणखी प्रभावीपणे काम करणार असल्याचे संतोष खरटमोल यांनी सांगितले.
0 Comments