Ticker

6/recent/ticker-posts

पर्यटकांच्या आकर्षणात पडली नवी भर!ललवाणी अॅग्रो टुरिझममध्ये सेल्फी पॉईंट अन् सजावटीच्या सायकलचे लोकार्पण


निसर्गाच्या सान्निध्यात मनजीया रेस्टॉरंटमध्ये आकर्षक सेल्फी पॉईंट व डेकोरेटेड सायकलचे लोकार्पण

भुसावळ : येथून जवळच असलेल्या कुर्‍हे पानाचे येथील ललवाणी ॲग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंटच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंट व डेकोरेटेड सायकलचे लोकार्पण भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले आणि नुकतेच पदोन्नती झालेले सहाय्यक संचालक व सरकारी अभियोजक, गृह विभाग ॲड. सुनील चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या परिसराला भेट दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी “येथे आल्यानंतर सर्व ताणतणाव दूर होऊन सुखद अनुभूती मिळाली,” अशा भावना व्यक्त केल्या. ललवाणी अॅग्रो टुरिझम हे पर्यटकांसाठी शांतता, समाधान आणि आनंद देणारे ठिकाण असल्याचे त्यांनी नमूद केले. जल, जमीन आणि जंगलाचा सुंदर मेळ या ठिकाणी अनुभवायला मिळतो, असेही त्यांनी सांगितले.


 निसर्गाच्या सान्निध्यात अभिनंदन सोहळा

जळगाव येथे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोजक, गृह विभाग या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल अॅड. सुनील चोरडिया यांचा अभिनंदन सोहळा मनजीया रेस्टॉरंटच्या निसर्गरम्य, लेक व्ह्यू परिसरात उत्साहात पार पडला.

यावेळी अॅड. चोरडिया यांनी ललवाणी परिवाराने मेहनतीने उभ्या केलेल्या या निसर्गरम्य पर्यटनस्थळाचे कौतुक केले. पर्यटकांनी येथे येऊन दैनंदिन जीवनातील ताणतणाव विसरावा, निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद आनंद घ्यावा, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सुविधा उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

खास खानदेशी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता यावा, रुचकर भोजन तसेच आरामदायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याबद्दलही त्यांनी ललवाणी परिवाराचे अभिनंदन केले.



 मान्यवरांचा सन्मान

ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एम. ललवाणी यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले आणि अॅड. सुनील चोरडिया यांचा शाल, पुष्पगुच्छ, गोमातेची मूर्ती तसेच ‘घरट्यातून आकाशाकडे’ हे पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रा. डी. एम. ललवाणी यांनी आपल्या मनोगतातून दोन्ही मान्यवरांनी ललवाणी अॅग्रो टुरिझमला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. अॅग्रो टुरिझमची निर्मिती करण्यामागील भूमिका, ग्रामीण निसर्गाशी पर्यटकांना जोडण्याचा उद्देश आणि या माध्यमातून आनंददायी अनुभव देण्याचा प्रयत्न याबाबत त्यांनी माहिती दिली.

🚜 ट्रॅक्टर फेरी अन् निसर्गरम्य परिसरात फोटोसेशन

कार्यक्रमानंतर भुसावळ, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर व यावल येथील अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील तसेच विशेष सरकारी वकील यांनी अॅग्रो टुरिझम परिसराची पाहणी केली.

यावेळी सर्व वकिलांनी ट्रॅक्टर फेरीचा आनंद घेतला, शिवाराची माहिती जाणून घेतली आणि गोमातेचे अभिवादन केले. निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेत उपस्थितांनी मोठ्या उत्साहात फोटोसेशन केले.

अभिनंदन सोहळ्याच्या आयोजनासाठी ॲड. मोहन देशपांडे, राजीव तडवी, भूषण भामरे, रवींद्र रोकडे, कृतिका भट, कल्पेश देशमुख आदींनी सहकार्य केले.


“निसर्गाच्या कुशीत आनंदाची अनुभूती; ललवाणी ॲग्रो टुरिझम ठरतेय पर्यटकांच्या आकर्षणाचे नवे केंद्र!”

Post a Comment

0 Comments