महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा उपक्रम; रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हसाठी Employer Registration सुरू
मुंबई : महाराष्ट्रातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी उद्योग, उद्योग समूह, MSME, विविध आस्थापना तसेच नियोक्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्योगांनी पुढे यावे; रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या कराव्यात!
आज अनेक सुशिक्षित व कौशल्यप्राप्त युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळाची गरज आहे. या दोन्ही घटकांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्यासाठी रोजगार महाकुंभ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
त्यामुळे “नोकरी शोधणाऱ्या युवकांना संधी आणि उद्योगांना योग्य मनुष्यबळ” या उद्देशाने नियोक्त्यांनी रोजगार महाकुंभात सहभागी होऊन आपल्या उपलब्ध रोजगार संधींची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Employer Registration आवश्यक
रोजगार मेळावे किंवा प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योग, उद्योग समूह, MSME, आस्थापना व नियोक्त्यांनी Employer Registration Form भरून प्राथमिक माहिती अचूक व पूर्णपणे सादर करावी.
नोंदणीसाठी लिंक :
Employer Registration Form – रोजगार महाकुंभ महाराष्ट्र
आव्हान स्वीकारा; रोजगार निर्मितीत भागीदार व्हा!
“फक्त उद्योग वाढवू नका, तर रोजगाराच्या संधीही निर्माण करा!” या भावनेतून राज्यातील उद्योग व नियोक्त्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे. एका उद्योगाने दिलेली एक रोजगाराची संधी एखाद्या युवकाच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकते.
म्हणूनच रोजगार महाकुंभ हा केवळ रोजगार मेळावा नसून उद्योग आणि युवा शक्तीला जोडणारा महत्त्वाचा सेतू ठरणार आहे.
“उद्योगांनी हात पुढे करावा... महाराष्ट्राच्या तरुणाईला रोजगाराची नवी दिशा द्यावी!”
0 Comments