Ticker

6/recent/ticker-posts

KBC 18 मध्ये २५ लाखांचा विजय; विशाल राठोड यांचा कळंबा येथे सत्कार

‘Player of the Week’ ट्रॉफीही पटकावली; वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

मंगरुळपीर : सुधाकर चौधरी

मंगरुळपीर तालुक्यातील दाभा सर्कलमधील कळंबा गावचे सुपुत्र विशाल प्रेमचंद राठोड यांनी KBC 18 मध्ये तब्बल २५ लाख रुपयांची रक्कम जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना ‘Player of the Week’ ही मानाची ट्रॉफीही प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे मंगरुळपीर तालुक्यासह संपूर्ण वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विशाल राठोड यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या ज्ञानाची, आत्मविश्वासाची आणि जिद्दीची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर विशाल राठोड यांनी भेट दिल्यानंतर त्यांच्या या यशाबद्दल मा. जिल्हा परिषद सदस्य दिलीपभाई मोहनावाले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

KBCच्या हॉटसीटवर विशाल राठोड यांनी दाखवलेला आत्मविश्वास, सामान्यज्ञानावरील पकड, प्रसंगावधान आणि जिद्द विशेष कौतुकास्पद ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठण्याची जिद्द ठेवली तर ग्रामीण भागातील तरुणही मोठ्या व्यासपीठावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतो, हे विशाल यांच्या यशाने अधोरेखित केले आहे.

विशाल राठोड यांच्या या यशामुळे कळंबा गावापासून मंगरुळपीर तालुक्यापर्यंत आणि संपूर्ण वाशीम जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीतही अशीच उत्तुंग कामगिरी घडत राहावी, यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“ज्ञान, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने गाठली ‘KBC’ची हॉटसीट; २५ लाखांच्या विजयाने वाशीमचा डंका देशभर!”

जुबेर मोहनावाले
युवासेना जिल्हा प्रमुख, वाशीम
तथा युवा प्रदेश उपाध्यक्ष, गवळी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments