Ticker

6/recent/ticker-posts

धर्मगुरू डॉ.रामराव बापू यांच्या अंत्यदर्शनासाठी... उसळला भक्तीसागर! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भक्तांचे अश्रू अनावर* बंजारा काशी झाली पोरकी



धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांच्यावर तीर्थक्षेत्र पोहरादेवी वाशिम जिल्ह्यातील तालुका.मानोरा या त्यांच्या जन्मगावी हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जय जगदंबा, जय सेवालाल, रामराव बापू अमर रहे या जयघोषात अतिशय भावविभोर आणि साधू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.गुरु पौर्णिमेला या जगात प्रगट झालेल्या बापूजींचे कोजागिरी पौर्णिमेला या जगातून प्रस्थान झाले. बंजारा आणि इतर ही समाजातील अनिष्ट प्रथा,रुडी याविरुद्ध सतत बालब्रह्मचारी संत डॉ. रामराव महाराजांनी आवाज उठवला. समाजाला मार्गदर्शकाची भूमिका तपास्वी संत रामराव बापूनी आजन्म पार पाडली. शिक्षणाचे महत्व बंजारा समाजासोबत इतरही समाज समूहांना ते वेळोवेळी 



सांगत असत. शिक्षणाने मानवाला आपले जीवन अधिक सुलभ बनविता येते यासाठी समाजाने शिका आणि
एकजूट व्हा ही शिकवण त्यांनी शेवटच्या धासापर्यंत दिली.आजारी असताना सुद्धा देशाच्या नेतृत्वाला भेटून समाजाच्या उद्धारासाठी बापू कार्यमग्न राहिले. बंजारा समाजामध्ये प्रगट होऊन अखंड ब्रह्मचर्याचे पालन करून समाजाचा उद्धार करणाऱ्या पुरुषांमध्ये बंजारा समाजाचे आराध्यदेवत क्रांतिकारी संत सेवालाल



महाराज यांच्या नंतर पूज्य संत डॉ.रामराव महाराज यांनी मोठे कार्य केलेले आहे. क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांनी लावलेला दिवा पूज्य संत डॉ. रामराव बाप्पूर्जी नी ते वत ठेवल्याने समाज प्रगतीकडे वेगाने वाटचाल करीत आहे . आपल्या आयुष्याचे त्याग करीत आपले संपूर्ण आयुष्य मानवतेसाठी, समाजहितासाठी
झिजवत तपस्येचे, त्यागाचे एक अनोखे उदाहरण आजच्या आधुनिक युगात तुम्हा- आम्हा तून जाऊनही पूज्य संत डॉ. रामराव बापूजी ने अखिल मानव समाजासमोर ठेवलेला आहे.तीर्थक्षेत्र पोहरादेवीतील स्वकीय संत परिवार द्वारा आयोजित या शेवटच्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्व
समाजातील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी,वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, अफाट भक्त सागराने बापूजीना दिलेल्या शासकीय इतमामातील अंत्यविधीला उपस्थित राहून अध्यात्माच्या सागराला अश्रुपूर्ण नयनांनी आदिशक्ती अगदंबा, संत शिरोमणी सेवालाल महाराज रामराव बापू अमर रहे या जयघोषाने अखेरचा निरोप दिला.

Post a Comment

0 Comments