Ticker

6/recent/ticker-posts

८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंद या आंदोलनातशेतकऱ्यांनी सहभागी व्हावे-चंद्रकांत ठाकरे


★वाशिम खबर संपादक सुधाकर चौधरी★


वाशीम :◆ केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा व देशाच्या काना कोपऱ्यातुन लाखो शेतकरी ऐन कडाक्याच्या थंडीत मागील अकरा दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. परंतु, केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतक-्यांच्या वतीने उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंद ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असून जगाचा पोशिंदा जगला पाहिजे तरच देश जगेल म्हणून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी उद्याचा भारत बंदला यशस्वी करण्यासाठी व व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा देण्यासाठी
आपली प्रतिष्ठाने बंदठेवावी. ७/१२ वर मालक म्हणून
रहायचे असेल तर उद्याच्या ८/१२ च्या भारत बंद मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.
आपला देश कृषिप्रधान देश आहे शेतकरी शेतामध्ये राबराब राबून अन्न पिकवतो व त्यामुळेच आपण आपण आहोत, केंद्र सरकारने 
शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे केले. परंतु हे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्यामुळे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणासह
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी होत असतानाही केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे.
शेतक-याकडे शेती शिवाय उदरनिर्वाहाचे कोणतेचसाधन नसून वावर आहे तरच पावर आहे, म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्याच्या भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून बंदला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्यासाठी सहभागी व्हावे, व जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी देखील पाठिंबा देण्याकरिता आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकऱ्याचे दुःख समजून घ्यावे, शेतकऱ्यांना सात-बारावर नाव हवे असेल तर आठ बाराच्या संपात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे. अभी नही तो कभी नही. 08:12 आंदोलन आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं





Post a Comment

0 Comments