Ticker

6/recent/ticker-posts

धानोरा खुर्द ता मंगरूळ पीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रास्ता रोखो आंदोलन, आर.के.राठोड,



केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ शेतक-्यांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर ग्रामीण भागात चक्काजाम करण्यात आला होता. केंद्र सरकारने केलेला नवीन कृषि कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी विविध संघटनांनी व पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते.  धानोरा फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व धानोरा खुर्द परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आर.के.राठोड, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष  ज्योती ठाकरे ,पंचायत समितीचे सदस्य अनंत शेळके,
 सुभाष कावरे, विजय जाधव, अकबर पटेल, जावेद भाई खेमसिंग राठोड सरपं, सुभाष राठोड, गौतम खडसे, दादाराव खडसे, सतीश खडसे, गबर राठोड, काशीराम चव्हाण, सुरेश राठोड , जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, , दिनेश चव्हाण, राष्ट्रवादीच्या नूतन राठोड या आंदोलनात इत्यादींचा सहभाग होता. 

Post a Comment

0 Comments