पुसद ◆
तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या नानंद खुर्द येथील रहिवासी असलेल्या एकास किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याला पुसद येथील मेडिकेअर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत
नानंद खुर्द येथील रहिवासी असलेला गंभीर जखमी संदीप श्रावण धोत्रे वय ३२ वर्ष याच्या पत्नी सोबत आरोपी बोलत असतांना त्याला जखमीने हटकल्याच्या किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. १९ ऑक्टोंबरच्या संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी राजु रंजित चाकोते वय २५ वर्ष नानंद ईजारा येथील रहिवासी असून यांने चाकूने हल्ला करून जखमीला पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देव तारी त्याला कोण मारी दैव बलवत्तर म्हणून गंभीर जख्मीचा जीव वाचला आहे तर आरोपी विरोधात खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शुक्ला यांच्या मार्फत सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दैव बलवत्तर म्हणून गंभीर जख्मीचा जीव वाचला आहे तर आरोपी विरोधात खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शुक्ला यांच्या मार्फत सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

0 Comments