Ticker

6/recent/ticker-posts

अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकाविल्यास दंडात्मक कारवाई होणार





वाशिम जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींचे १०० टक्के कोविड लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी काही व्यक्तांचे समुपदेशन तर काही व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करताना काही पात्र व्यक्ती ह्या लसीकरण करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना शिवीगाळ करीत आहे. तर काही व्यक्त कर्मचाऱ्यांना धमक्या देत असल्याची माहिती मिळाली आहे. लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावून लस न घेता त्यांच्या कामात लसीकरण करणाऱ्या अधिकारी


कर्मचाऱ्यांना संरक्षण
व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अथक संशोधनातून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली. त्यामुळे कोरोनाचा वाढता
संसर्ग आणि होणारे मृत्यू आटोक्यात आणण्यात यश आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेली लस देण्यास १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झाली. अनेकांनी या लसीचे दोन्ही डोस घेतले. काही पात्र व्यक्तीने पहिला डोस घेतला आहे. तर काहीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. तर काहींनी अद्यापपर्यंत एकही डोस घेतलेला नाही. ज्यांनी अद्यापही एकही डोस घेतला नाही त्यामागील कारण म्हणजे त्यांचे लसीबाबत असलेले गैरसमज आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही अत्यंत सुरक्षित असून त्याबाबत गैरसमज करून घेणे हे अत्यंत चुकीचे आहे.


Post a Comment

0 Comments