Ticker

6/recent/ticker-posts

लसीकरण झाले असेल तरच मिळेल रेशनचे धान्य उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे


लस घेतल्याचे प्रमाणपत्र मगध धान्य मिळेल
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी .





■ सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना सुचित करण्यात येते की शासनाच्या निर्देशानुसार कोविड- १९ लस घेणे अनिवार्य आहे ज्या शिधापत्रिका धारकांनी कोविड-१९ लस घेतली आहे. त्यांनी कुटुंबातील व्यक्तींचे लसीकरणाचे प्रमाणपत्र धान्य वाटपाच्या वेळेस सोबत घेऊन यावे त्यानंतर त्यांना त्यांचे धान्य वाटप करण्यात येईल १८ वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करणे बाकी आहे त्यांनी पुढील प्रमाणे दिलेल्या ठिकाणी व दिनांकाच्या वेळी उपस्थित राहुन लसिकरण करूण घेतल्यानंतर त्यांचे धान्य वितरीत करण्यात येईल



कोविडच्या संभाव्य तिसऱ्या | लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. याकरिता सर्व यंत्रणेकडून प्रयत्न करून लसीकरणाचा वेग वाढवा, लसीकरण वाढविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील स्वस्त राशन केंद्रावरून लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य वितरित करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे मंगरुळपीर यांनी दिलेअन्न पुरवठा अधिकारी यांना दिले.
तालुक्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत गुरुवारी आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेऊन दिवाळीपर्यंत लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत नियोजन करण्याचे सांगितले.
ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे व लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्याबरोबर इतर नागरिकांनी लस घेणे बंधनकारक आहे आपण सुरक्षित तर देश सुरक्षित. माझे कुटुंब माझी जबाबदारी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी व शिधापत्रिका कुटुंब सदस्य यांचे लसीकरण झाल्याबाबत खातरजमा करा. ग्रामीण व शहरी भागातील दुकाने, उद्योग ठिकाणी
लसीकरणाबाबत पाठपुरावा करा. अन्नपुरवठा विभागाच्या अधिकारी यांनी तालुकास्तरावर ग्रामीण भागात भेटी देऊन लसीकरणाबाबत आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंगरूळपीर पंचायत समिती सभागृहात
बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे , अन्नपुरवठा विभागाच्या io रूपालीताई सोळंके, fsi दोनदलवार मॅडम , मंगरूळपीर रास्त भाव दुकान युनियनचे अध्यक्ष गजानन राऊत तसेच तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments