वाशिम खरं तर पत्रकारांवर हल्ले व्हायलाच नको. पण पत्रकारावर जर हल्ला होत असेल, तर पोलिस प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे स्पष्ट सूतोवाच जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मंगळवारी (दोन नोव्हेंबर) केले. स्थानिक पत्रकार भवनात आयोजित एका सामाजिक कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई येथील ओंकार संस्थेच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील अंघ बांधवांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्याचे वाटप आणि भेटवस्तूंचे वितरण जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ राऊत, विश्वास वाल्ले, दिव्यांग चेतन उचितकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अंध बांधवांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. त्यानंतर, अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे वाशीम जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गजानन वाघ यांनी जागतिक पत्रकार हल्ला बिरोधी दिनाच्या अनुषंगाने भाष्य
केले. पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी आपल्या जिल्ह्यात प्रभावीपणे व्हावी, अशी वाजवी आणि माफक अपेक्षा त्यांनी समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने व्यक्त केली. आपल्या मनोगतात जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह म्हणाले, पत्रकारांवर हल्ले होणे ही बाब निषेधार्ह आहे. असे हल्ले होणार नाहीत, याची आपण सर्व काळजी घेऊ या. पण जिल्ह्यात असे प्रकार घडल्यास त्याची यथोचित शहानिशा करून गंभीर दखल घेतली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून मुंबई संलग्नित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्याध्यक्ष माधवराच अमोरे यांनी मुंबईच्या ओंकार संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. अथ बांधवांना जागतिक पत्रकार हल्ला
विरोधी दिनाची पूर्वपीठिका सांगितली. अमोरे म्हणाले, महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत होते. त्याविरोधात पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना केली होती. समितीच्या वतीने सतत बारा वर्षे, संघर्ष, आंदोलन केल्यानंतर ७ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याचे एक विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडले. ते एकमताने संमत झाले. त्यावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला. कायदा झाल्यानंतर पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. तरीही
राज्यात सध्या १० दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे. पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे. त्याचे नक्कीच कौतूक असले तरी हा कायदा केवळ कागदोपत्रीच राहू नये, अशी अपेक्षा अमोरे यांनी व्यक्त केली. पत्रकार शिखरचंद बागरेचा यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर शिंदे, अजय ढवळे, नंदकिशोर वैद्य, अनिल वाल्ले, मदन देशमुख, गणेश भालेराव, राम चौधरी, राजदत्त पाठक, प्रा. राम धनगर, रमेश उंडाळ आदी उपस्थित होते. (श.प्र.)
0 Comments