Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

           
                                                                      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या व माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या दिवशी १२ डिसेंबर २०२१ रोजी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व पवार साहेबांच्या विचारधारेने प्रेरित होऊन मा अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे हस्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कारंजा शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष हमीद शेख,उपाध्यक्ष कादर अहेमद खान,उपाध्यक्ष हाफिज राज,अब्दुल खालिद, मो फिरोज़,अंसार अहमद,रहेमान ठेकेदार,आमद बेनिवाले,उस्मान खान आदी असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी रांका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी सह,रांका तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड,शहराध्यक्ष सुभान कामनवाले,रांका पदाधिकारी जयदेवरव इंगळे,नितीन गाडगे,सागर दुर्गे,योगेश इंगळे आदी उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments