वाशिम, दि १२
:-देशात अनेक विचारवंत, महापुरुष निर्माण झाले, आता त्या विचारावर आचरण करणारे आचारवंत निर्माण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी केले.
अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्याची सभा आज (दि.१२)श्री शिवाजी हायस्कूल येथे उत्साहात संपन्न झाली. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार
या सभेच्या अध्यक्षस्थानी अविनाश पसारकर हे होते तर पुणे जिल्हा संघटक शिवाजी खेडेकर, लक्ष्मीकांत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कोम्पलवार पुढे म्हणाले की, अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध आंदोलनामुळे माहीतीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, दारू बंदीचा कायदा, ग्रामसभा, ग्रामरक्षक दल, लोकपाल कायदा असे १० कायदे करणे सरकारला भाग पडले. तथापि लोकशिक्षण व लोकजागृती अभावी याची योग्य अंमलबजावणी होत नाही.
लोकपार कायदा होऊनही महाराष्ट्रासह अनेक राज्यात अद्याप त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. याउलट लोकपाल कायदा निष्प्रभ करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
यामुळे भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने पुन्हा डोके वर काढले आहे. या पृष्टभूमीवर पुन्हा एकदा जन आंदोलन करण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यातील २५२ तालुक्यात संघटनेची पक्षविरहीत पुनर्रचना करून चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे संघटन उभे करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे समाजाप्रती समर्पित कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. कोम्पलवार यांनी केले.
अण्णांच्या आंदोलनानंतर तत्कालीन केंद्र सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला आणि एका वर्षात राज्य सरकारने लोकपालाच्या धर्तीवर राज्यात कलम ६३ नुसार लोक आयुक्तांची नेमणूक केली नाही. याऊलट आताच्या सरकारने लोकपाल कायद्यात दिड पानी दुरूस्ती करुन कायदा निष्प्रभ करण्याचे काम केले. केंद्राने हा कायदा सर्वसामान्यांना समजू नये यासाठी इंग्रजी भाषेत छापला तर सर्व सामान्यांपर्यंत पोहचू नये यासाठी त्या ३२ पानाच्या कायद्याचा पुस्तिकेची किंमत ६२५ रुपये आणि दिड पानाच्या दुरुस्तीची किंमत १६९ रुपये ठेवली. यामागे सर्वसामान्यांना परवडू नये,असे सरकारचे षडयंत्र आहे.असा अजब सरकारचा गजब कारभार असल्याची माहिती देत हे धंनानंदाचे सरकार असल्याची टीका पुणे जिल्हा संघटक शिवाजी खेडेकर यांनी केली.
अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार ,
पुणे जिल्हा संघटक शिवाजी खेडेकर,
वाशिम जिल्हा संघटक अविनाश पसारकर, मंगरूळपीर तालुका सुधाकर चौधरी, समाज सेविका ध्यास फाउंडेशन च्या अश्विनीताई राम अवताळे इत्यादी मान्यवर
या सभेला वाशिम मंगरूळपीर मानोरा कारंजा मालेगाव रिसोड कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
या सभेचे संचालन प्राचार्य बबनराव ठाकरे यांनी केले.






0 Comments