Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांचे काडीचेही नुकसान होऊ देणार नाही - हवामान तज्ञ पंजाबराव डख, राजमुद्रा ग्रुप चा शेतकऱ्यांसाठी उपयोगी उपक्रम

मंगरुलपीर 
तालुक्यातील शेलुबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी पुत्र हवामान तज्ञ  पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांचे काडीचेही नुकसान होऊ देणार नाही अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.. शेलूबाजार येथील राजमुद्रा ग्रुप चे अध्यक्ष पवन राठी व कंझरा सर्कलच्या जि.प. सदस्य सौ.सुनीता पांडुरंग कोठाळे यांनी  शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते . माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार व माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन आयोजित केले होते या कार्यक्रमा उद्घाटक म्हणूनला सुभाषरावजी ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंजाबराव डख, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जि.प .
अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, रा .कॉ.तालुकाध्यक्ष आर. के.राठोड,
 जिनिंग प्रेसिंग मंगरूळपीर चे राजूभाऊ मिसाळ, पुणे बाजार संघाचे संचालक विठ्ठलरावजी गावंडे, कृषी उत्पन्न समिती चे सभापती राजू पाटील राऊत, सोसायटी नागपूरचे वसंतराव पाटील शेगीकर, खरेदी विक्री संघ मंगरूळपीर चे अध्यक्ष डॉ. सदाशिवराव जाधव, जि.प. सदस्य चंद्रकांत पाकधने, आबासाहेब सुर्वे यांची उपस्थिती होती, उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते' छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले सुभाषरावजी ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक असलेले शेतकऱ्यांचे कैवारी शेतकरी पुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी हवामानाच्या बदलत्या अंदाजा विषयी तसेच शेतकऱ्यांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नये, तापमान वाढल्याने पाऊस वाढेल त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत, व अंदमान निकोबार या बेटाचे वारकऱ्याच्या वारी चे उदाहरण देत वरून राजा ची दिंडी यांची मजेदार सांगड घातली, तसेच गारपीट होण्याची कारणे, पाऊस येण्याची कारणे तांबड्या रंगाचे आभाळ झाल्यास तीन दिवसात पाऊस पडेल, घरामध्ये असलेल्या लाईटच्या आजूबाजूने किडे असल्यास, जास्त प्रमाणामध्ये गर्मी होत असल्यास, चिमनीने  धुळीत आंघोळ केल्यास, तसेच आकाशातील विमानाचा आवाज आपल्याला येत असल्यास पाऊस येण्याची कारणे आहेत. तसेच पाऊस न येण्याची कारणे सुद्धा यांनी सांगितली आहेत.  वीज पडण्याची कारणे सांगत असताना त्यांनी मंदिराच्या कळसावर वीज पडते, कळस हा गावाचे रक्षण करणारा असते तसेच पाऊस चालू असल्यास व आपण शेतामध्ये असल्यास आपल्या पायाचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये जेणेकरून आपल्या अंगावर वीज पडणार नाही. तसेच डख यांनी स्वतः च्या शेतीचा मनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सांगितला. हवामान खात्याच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना अचूक अंदाज यावा यासाठी त्यांनी १५ दिवस अगोदर माहिती देण्याचे आश्वासन दिले, तसेच शेती पिकण्याची, शेतीमध्ये कोणते उत्पन्न घ्यावे, ते किती कालावधीत येईल, त्याची काढणी कशी करावी, याबद्दल हवामान खात्याचा अचूक अंदाज ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. व यापुढे शेतकऱ्यांचे काडीचे ही नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तसेच शेलूबाजार येथील राजमुद्रा ग्रुप चे कार्य उल्लेखनीय असून अशीच पुढे वाटचाल करावी याबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ. कविता पवन राठी यांनी तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे व आभार प्रदर्शन आतिष पाटील चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील हजारो शेतकऱ्यांची, शेतकरी पुत्रांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments