Ticker

6/recent/ticker-posts

ऑमीक्रोनशी लढण्याचा संकल्प -चंद्रकांत ठाकरे, जि. प. अध्यक्ष




गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गजन्य आजारामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. त्यामुळे अपेक्षित कामे झाले नाहीत.  मात्र नववर्षात जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासाचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसह प्राथमिक आरोग्य सुविधा देणे व छोटी गाये स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प आहे. 
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने वाढत आहे. 31 डिसेंबर आणि त्यानंतर नविन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची धार्मिकस्थळी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. अशा ठिकाणी लोकांनी गर्दी न करता सगळयांनी घरात राहूनच हा उत्सव साजरा करावा. असे आवाहन वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments