मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.31 डिसेंबरला लाईफ सायन्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. विज्ञान शाखेतील लाईफ सायन्स या विषयातील विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी, मैत्रीपूर्ण व सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी व येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी सदर आसोशिएशनची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. पी.राऊत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून प्रा. हर्षवर्धन श्रृंगारे, प्रा. अस्लम खान, प्रा. विशाल खडसे, प्रा. परमेश्वर पडघाण, प्रा. लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. ठाकरे, प्रा. श्रीकृष्ण जटाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. तुबा इराम हिने केले. त्यानंतर असोशिएशनच्या डायरीचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात प्रा. हर्षवर्धन श्रृंगारे यांनी अभ्यासाव्यतिरिक्त वैज्ञानिक जगात सुरू असलेल्या संशोधनाबाबत जागृत राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. संजय गोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात यासारख्या असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. व्ही. पी. राऊत यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्वक उपक्रम राबवून, आपला विज्ञानवादी दृष्टिकोन सतत विकसित करण्याचे आवाहन केले. या निमित्याने महाविद्यालयात सेमिनार स्पर्धा व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक पेपरचे सादरीकरण केले. त्यामध्ये कु. तुबा इराम साक्षी कोठेकर, प्रतीक्षा पाठक अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पोस्टरही स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कु. पल्लवी चव्हाण व मनिषा सोळंके यांनी सर्वप्रथम, जोश ढोले व अंजली नानोटे यांनी व्दितीय तर श्रेयश कालुडोणकर व सागर बोरचाटे याने तृतीय क्रमांक मिळविला. या कार्यक्रमांकरीता सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ.आनंद पांडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments