नागरी सत्कारानिमित्त संविधानाच्या ७५ प्रतींचे मोफत वितरण
नवी मुंबईचे नगरसेवक संजु वाढे व सुरेखा वाढे यांचा अभिनव उपक्रम
वाशिम - आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपाळराव आटोटे यांच्या २९ डिसेंबर रोजी स्थानिक विठ्ठलवाडी येथे पार पडलेल्या नागरी सत्कारानिमित्त नवी मुंबईचे नगरसेवक संजु वाढे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा वाढे यांच्या पुढाकारातून उपस्थितांना भारतीय संविधानाच्या ७५ प्रतींचे मोफत वितरण करण्यात आले. ‘बुके नको बुक द्या’ या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक रामप्रभु सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून लाँगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे, नागपूर दीक्षाभूमीच्या विश्वस्त आचार्य प्रा. कमलताई रामकृष्ण गवई, स्वागताध्यक्ष म्हणून नारी शक्ती जागृती फाउंडेशनच्या महाराष्ट्र अध्यक्षा संगीता वसंतराव इंगोले, प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षक आ. किरणराव सरनाईक, माजी आ. विजयराव जाधव, जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती सुरेश मापारी, सभापती वनिता देवरे, नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य मुंबईचे कार्याध्यक्ष संजुभाऊ वाढे, सुरेखाताई वाढे, प्रतिभाताई सोनोने, पिरिपा राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, पिरिपा विदर्भ अध्यक्ष चरणदास इंगोले, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेश पडघाण गुरूजी, कारंजा न.प. अध्यक्ष शेषराव ढोके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले, समाजसेवक माणिकराव सोनोने, जि.प. सदस्य दिलीपराव देशमुख, मधुकरराव जुगडे, जुलकिशोर कोठारी, माजी नगराध्यक्ष दिपकराव भांदुर्गे, डॉ. सिध्दार्थ देवळे, विनोद पट्टेबहाद्दुर , चरण गोटे, सिध्दार्थ देवरे, राजु चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख, पिरिपा जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, रिपाइंचे दे.वा. इंगळे, परमेश्वर अंभोरे, विजय मनवर, नितीन पगार, सय्यद रहेबर आदींची उपस्थिती होती.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments