रस्ता ओलांडतांना आपल्या सहकाऱ्याचा अपघात होवुन रोडवर ठिय्या मारून बसलेले मानवाचे हे वंशज आज हतबल आहेत.
भरधाव वाहनाची जबर धडक बसुन रक्ताच्या थारोळयात सापडलेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी, त्याला कळपात पुन्हा आनण्यासाठी मुक्या प्राण्यांचा हा आक्रोश पाहवत नाही.
निसर्गाशी कृतघ्न झालेल्या स्वार्थी मानवाने आपल्या वाटयाबरोबरच इतर जिवांचाही वाटा निसर्गाकडुन ओरबडुन घेतला.
,कंस्ट्रक्शनच्या नावाखाली मानवाने निसर्गाचे डिस्ट्रक्शन करून वन्यजिवांचे अधिवास उध्वस्त केले म्हणुनच वेळ आलीय वन्यजिवांना अन्नपाण्यासाठी भटकंती करण्याची.
वन्यक्षेत्रातुन मार्गक्रमण करीत असतांना वेग मर्यादीत असावा हा झाला वाहतुकिचा नियम मग कारंजा-महागांव रस्त्यावर भरधाव वेगाने जाण्यााऱ्या त्या चालकाला माकडांचे हे कळप रस्ता ओलांडतांना दिसले नसतील का? हाच प्रश्न आहे.
भौतिक विकासासाठी, तुम्ही झाडे तोडा, हिरवीगार जंगले आणि कुरणे भकास करा *मग वन्यप्राणी उद्या अन्नाच्या शोधार्थ मानव वस्तीत शिरतील, परिणामी नासधुस करतील, एखाद्या मानवाची शिकारही करतील. निसर्ग नियमाच्या अन्नसाखळीत हे सर्वही तेव्हा माफ असेल.
म्हणुन हे स्वार्थी मानवा अधिकार आहे नक्कीच तुला प्रगतीचा परंतु विसरू नकोस कायदा गतीचा. राहतो येथे अजुनही कुणीतरी आपल्याच मातीचा.
प्रा.राम धनगर

0 Comments