Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 वाईन विषयक निर्णय रद्द करण्याची मागणी
 वाशिम :- राज्यातील मॉल, सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी देणारा निर्णय रद्द करावा, अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज (दि ११) देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 
अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे वाशिम जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात यामुळे सहजतेने दारू उपलब्ध होईल. यामुळे तरूण पिढी व्यसनाधीन होईल, यामुळे सर्वसामान्य व महीलांना त्रास होईल. केवळ महसूल गोळा करण्याच्या या दुर्दैवी निर्णयामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यथित झाले असून त्यांनी १४ फेब्रुवारी पासून राळेगण सिध्दी येथे बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाचा व त्यांच्या वयाचा विचार करता, या वयात अण्णा हजारे यांना वाईन धोरणाविरोधात उपोषणाला बसावे लागते ही बाब महाराष्ट्रासाठी लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे शासनाने सुपर मार्केट व किराणा दुकानात वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देणारा निर्णय रद्द करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच या मागणीचा विचार न केल्यास अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने विविध आंदोलनात्मक पाऊल उचलण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर, सुधाकर चौधरी, राजकुमार बोनकिले, विनायक उज्जैनकर, सय्यद अयुब सय्यद मनवर, प्रा. प्रशांत कवर, जयंत सरनाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments