वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये कर्तव्यास कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष तेजराव जंजाळ, श्री. अमित हरिभाऊ डहारे, श्री. विलास धोंडीबा मुंढे, श्री. प्रमोद सुदाम सोनवणे, श्री. अजय जालमसिंग चव्हाण, श्री. आशिष अशोकराव देशमुख व श्री. नितीन देविदास दांदडे यांची पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षक पदी मा. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांचे
दि. २२/०३/२०२२ रोजीच्या आदेशांन्वये पदोन्नती करण्यात आली आहे. त्यापैकी श्री. संतोष तेजराव जंजाळ यांची औरंगाबाद परिक्षेत्र श्री. अमित हरिभाऊ डहारे यांची ला.प्र.वि., श्री. विलास धोंडीबा मुंढे व श्री. प्रमोद सुदाम सोनवणे यांची अमरावती परिक्षेत्र, श्री. अजय जालमसिंग चव्हाण यांची नागपूर शहर, श्री. आशिष अशोकराव देशमुख व श्री. नितीन देविदास दांदडे यांची मुंबई शहर येथे सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम येथे पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नत झालेल्या अधिकारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते सर्व पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी
सदर पदोन्नत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
0 Comments