Ticker

6/recent/ticker-posts

धाडी पडणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे आक्रमक


  मी जर काही चूक केली असेल तर मला विजय चौकात फाशी द्या असं खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक झाल्या आहेत. 
एकीकडे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन घमासान सुरू आहे. आज मुख्यमंत्र्यांनीही यावरुन भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर भाजपचे काही नेते या संस्थांच्या धाडीच्या आधीच त्याची माहिती सोशल मीडियावरून कशी काय देतात? यासंबंधी माहिती लीक होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा."

Post a Comment

0 Comments