Ticker

6/recent/ticker-posts

बस स्टैंड वर एसटीमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून 25 ग्रॅम सोन्याचा हार व 6500/-- रुपयांची अनोळखी महीलेने केली चोरी .


बस स्टॅण्ड वरून कारंजा येथे जाण्याकरीता सौ निलीमा श्रीकृष्ण गाढवे वय 35 वर्षे रा वाघागड ता . बार्शिटाकळी ज़ि अकोला आपल्या परिवारासह बुधवारी दिनांक 25/5/2022 रोजी दुपारी 2 वाजता च्या सुमारास मंगरूळपीर बस स्टँड वर कारंजा येथे जाणेकरीता  वाशिम ते अमरावती बस क्रमांक एम एच 40 N  97 18 मध्ये  चढताना गेटजवळ गर्दीचा फायदा घेत तोंडाला पांढरे स्कार्प बांधलेल्या अनोळखी महिलेने सौ निलीमा गाढवेंच्या पर्स मधून नगदी 6500/--रुपये व 25 ग्रॅम सोन्याचा हार त्याची किंमत62500/-- रुपये असा एकूण 69 हजार रुपये चोरी झाली .अशा तक्रारी वरून मंगरूळपीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास   पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुनील हुड यांच्या आदेशाने श्री स पो.नि डोंगरे करीत आहे .

Post a Comment

0 Comments