राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत १७ मे हा दिवस जागतीक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळला जातो. त्या अनुशंगाने विविध ठिकाणी रक्तदाब व शुगर ची तपासणी करण्यात येते.
आज दिनांक २५/०५/२०२२ रोजी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत १७ मे दिनाच्या अनुशंगाने जागतीक उच्च रक्तदाब दिनाचे औचीत्त साधुन पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे रक्तदाब व शुगर तपासणीचे शिबीर आयोजीत करण्यात आले. घेण्यात आलेल्या शिबिराला पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या कडुन उस्फुर्त प्रतीसाद मिळाला. सदर शिबीरा मध्ये पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बि.पी. व शुगर ची तपासणी करून घेतली. तसेच मा. श्री. बच्चन सिंह साहेब पोलीस अधिक्षक वाशिम यांनी सुद्धा बि.पी. व शुगर तपासणी करुन घेवुन कार्यालयातील उर्वरीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना बि.पी. व शुगर तपासणी करुन घेण्याबाबत सुचना दिल्या. सदर शिबीरा मध्ये १३ पोलीस अधिकारी व ८४ पोलीस अंमलदार असे एकुन ९७ लोकांनी तपासणी करुन घेतली.
सदर शिबीरा करीता जिल्हा सामान्य रुग्नालया येथील परीचारीका रवी जाधव, प्रियंका धनवजीर व समुपदेशक श्रीमती सारीका काळे मॅडम यांनी सहकार्य केले. सदर शिबीराचे आयोजन कल्याण शाखा यांचे कडुन करण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य रुग्नालया करुन येणाऱ्या टिम चे आभार मानले.
0 Comments