Ticker

6/recent/ticker-posts

समर्पित आयोग विभागावर हरकती नोंदवा. संतोष काळे

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे.

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. वरील दिलेल्या तक्त्यात विभाग, आयुक्त, व दिनांक आणी वेळ दर्शविली आहे. तरी आपल्या तक्रारी ,हरकती ,व ओबीसी आरक्षणाच्या बाबत आपल्या भूमिका मांडाव्या असे आव्हान ओबीसी संघटनेचे , संतोष काळे पत्रकार मंगरूळपीर,जि,वाशिम यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments