Ticker

6/recent/ticker-posts

खेळांमधून शारीरिक व मानसिक प्रगतीबरोबरच 'पोलीस जनता सलोखा' वाढेल पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS)


खेळांमधून संघभावना खिलाडीवृत्ती, एकोपा या गुणांची जोपासना होत असून समाजाच्या सर्वागीण विकासात खेळांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. हाच दृष्टीकोन नजरेत ठेवून पोलीस जनता सलोखा' उपक्रमांतर्गत वाशिम जिल्हा पोलोस दलातर्फे ०४ दिवसीय व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन दि.१४.०५.२०२२ ते दि. १७.०५.२०२२ या कालावधीत नवीन पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. आज दि.१४.०५.२०२२ रोजी सकाळी ०७.०० वाजता नवीन पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्याहस्ते पूजन व फीत कापून सदर सामन्यांचा उद्घाटन सोहळा पार पडला.
सदर ०४ दिवसीय व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये पोलीस मुख्यालयाचा एक संघ, वाशिम उपविभागमधून दोन संघ, मंगरूळपोर उपविभागमधून एक संघ, कारंजा उपविभागमधून दोन संघ, तर जनतेमधून अभिरुचो व्हॉलीबॉल क्लब, मालेगाव, मंगरूळपीर व्हॉलीबॉल क्लब, मंगरूळपीर, जवाहर नवोदय विद्यालय व वाशिम वॉरीयर्स, वाशिम असे एकूण १० व्हॉलीबॉल संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. आज दि. १४.०५.२०२२ रोजी नवीन पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ०२ सामने पार पडले असून पहिल्या पोलीस मुख्यालय संघ विरुद्ध वाशिम उपविभाग 'ब' संवादरम्यान झालेल्या सामन्यात पोलीस मुख्यालयाचा संघ विजेता ठरला तर दुसऱ्या मंगरूळपीर उपविभाग संघ विरुद्ध कारंजा उपविभाग 'ब' संघादरम्यान झालेल्या सामन्यात कारंजा उपविभागाचा 'ब' संघ विजेता ठरला आहे. उद्या दि. १५.०५.२०२२ रोजी एकूण ०४ सामने खेळविले जातील तसेच दि. १६.०५.२०२२ रोजी उपांत्य (सेमी फायनल) सामने व दि. १७.०५.२०२२ रोजी अंतिम (फायनल) सामन्याने सदर स्पर्धेची सांगता होईल. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी खेळांमधून आपला
सर्वांगीण विकास साध्य होता. शारीरिक व मानसिक संतुलन साधले जाते त्याचबरोबर आपल्यामध्ये संघभावना (Team work), खिलाड़ीवृत्ती (Sport Spirit) व एकोपा (Unity) निर्माण होते. अश्याप्रकारच्या स्पर्धांमधून पोलीस - जनता सलोखा' बाढून समाजात बंधुभाव निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS), परिविक्षाधीन सहा पोलीस अधीक्षक महक स्वामी (IPS) यांच्या सूत्रबद्ध नियोजन व नियंत्रणाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री. सुनीलकुमार पुजारी, पो.नि. श्री. सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, श्री. मांगीलाल पवार, रा. पो. नि. पोलीस मुख्यालय, वाशिम, श्री. राठोड, रा.पो.उप.नि., पोलीस मुख्यालय, वाशिम, ASI दिलीप घोडाम, ASI अज्ञानसिंग ब्राम्हण, NPC मोहम्मद मौसिक NPC आशिष जयस्वाल, PC आमीर खान व LPC माया मार आदीनी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments