Ticker

6/recent/ticker-posts

चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई


चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांचा दणका  मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच शाखेने चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या असून भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ केल्यामुळे आज दिनांक १६ रोजी राज्यात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहिती अशी की मुंबईतील शिवडी बंदर रोडवर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच शाखेने छापेमारी करत ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावं राजू अबुलजहर शेख, राहुल शेख अशी आहेत.


आपण आजपर्यंत अनेक गोष्टीत भेसळ होत असल्याचे बातम्या वाचल्या असतील. दुध,पनीर,खवा यातील भेसळ प्रकरण ऐकण्यात होती मात्र आज चहा पिणाऱ्यांनो सावधान… असं म्हणण्याची वेळ आली आहे. आज चहा पावडर भेसळीच्या रॅकेटमुळे ”तुमचा चहा भेसळ चहा पावडर पासून तर तयार झालेला नाही अशी शंका मनात

राज्यात खळबळ….

आता चक्क चहा पावडरमध्येही भेसळ सुरू असल्याचे समोर आले आहे.चहा पावडर मध्ये भेसळ असल्याबाबत पहिल्यांदाच मुंबईत कारवाई झाल्याने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दुध, पनीर, खव्या पाठोपाठ भेसळयुक्त चहा सुद्धा आता होतं असल्याने चहा पेय चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होतं आहे.


भेसळयुक्त चहा कशी ओळखणार….

चहा पिणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आज समोर आल्याने प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल की भेसळयुक्त चहा कसा ओळखायचा… तर जाणून घेऊया काही साध्या टिप्स प्रथम फिल्टर पेपर घ्यायचा, त्यावर चहा पावडर घ्यायची व पाण्याचे काही थेंब या पावडरवर कागद भिजेपर्यंत घालायचे, यानंतर हा फिल्टर पेपर नळाखाली धुवायचा या दरम्यान या पेपरला चहा पावडरचा गडद डाग पडल्यास त्या पावडरीत भेसळ आहे असं समजायचं जर पेपरला डाग पडला नाही किंवा अगदी हलका डाग पडला तर त्यात भेसळ नाही असे समजायचे.

Post a Comment

0 Comments