Ticker

6/recent/ticker-posts

अंबाबारवा अभयारण्यात ६ वाघ तर ६ बिबट्यांचे वास्तव्यचंद्राच्या लखलखीत प्रकाशात ८०१ प्राण्यांनी दिले दर्शन

संग्रामपूर:- बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबरवा जंगलात ६ वाघ, ६ बिबट्यांनी दर्शन दिल्याने नोंद करण्यात आली आहे. प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील वाघांशिवाय ८०१ वन्यप्राण्यांची नोंद केली आहे.
 मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात सोमवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत रात्री चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबारवा अभयारण्यात ८०१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले आहे. गत दोन वर्षा अगोदर २०२० मध्ये या अभयारण्यात एकूण ३ हजार १६८ वन्य प्राणी वास्तव्यास होते. दि. १६ रोजी दुपारी ४ वाजता पासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रम दि. १७ च्या सकाळी ८ वाजेपर्यंत राबविण्यात आला. यामध्ये वाघ ६, बिबट ६, अस्वल १५, तडस २, नील गाय ७०, सांबर ४९, भेडकी २८, गवा ४८, रान डुक्कर १७२, लंगूर २, माकड १५५, म्हसण्या उद ११, रान कोंबडी ५४, रान मांजर १, मोर १५१, ससा १०, सायाळ १२, कोल्हा २, लांडगा ७ असे एकूण ८०१ प्राण्यांनी दर्शन दिले. निसर्ग अनुभव घेण्यासाठी सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांनी जोरदार तयारी केली होती. अभयारण्यात ७ नैसर्गिक १८ कुत्रिम असे एकूण २५ पाणवठ्यावर २५ मचान उभारण्यात आले होते. यादरम्यान १६ वनरक्षक, ३५ वनमजूर, ४ वनपाल, ५ विशेष व्याघ्रदलाचे जवान कर्तव्यावर होते. तसेच ७ वन्यजीव प्रेमींना नैसर्गिक ७ पाणवट्यांवर प्रवेश देण्यात आला होता. 
सोनाळा, वाशिम, अमरावती येथील वन्यजीव प्रेमी अभयारण्यात हजर झाले. दोन वर्षापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अल्प प्रमाणात वन्यजीवांनी दर्शन दिले आहे. यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाल्याने वन्यजीव प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
-
सोमवारी दुपारी ४ वाजता पासून मंगळवारी सकाळी ८ वाजे पर्यंत अभयारण्य निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी प्राणी गणना करण्यात आली असून वाघ व बिबट शिवाय ईतर वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे.
सूनिल वाकोडे
वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)
सोनाळा ता. संग्रामपूर



Post a Comment

0 Comments