प्रतिनिधी।कारंजा
गत पावसाळ्यात भरपूर पाऊस झालेला असताना व कारंजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अडाण धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असताना सुद्धा कारंजा शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यैरणीवर आला आहे.कारंजा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या वतीने नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे शहरात पाण्यासाठी हाहाकार सुरू झाला आहे.यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न स्थानीय काजी प्लॉट या विभागात निर्माण झाला आहे.या विभागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी काजी प्लॉट वासीयांना मजीप्रा प्रशासनाला वारंवार निवेदन दिली आहेत परंतु या बाबीवर कोणत्याही तोडगा काढण्यात आलेला नसल्याने ही समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात २९ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री बच्चूभाऊ कडू हे कारंजा येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे मार्गदर्शनात काजी प्लॉट वासीयांना मागणीचे निवेदन राज्यमंत्री यांना दिले दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,सदर भागात दरवर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होत असून पाणी पुरवठा अनियमित केला जातो काजी प्लॉट येथे २५ वर्षांपूर्वी २५ ते ३० घरे होती म्हणून फक्त ५० एम एम ची पाईपलाईन टाकण्यात आली होती परंतु आता परिसरात वस्ती व लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे सदर पाईपलाईन तोकडी पडत आहे त्यामुळे या विभागात १५० एम एम ची पाईपलाईन टाकण्यात यावी व दिल्ली गेट ते रेल्वे गेट पर्यन्त ३ वर्षांपूर्वी १५० एम एम ची पाईपलाईन टाकण्यात आली होती त्या पाईपलाईन ला काजी प्लॉटचा पाणी पुरवठा जोडण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.यावेळी माजी नगरसेवक जाकिर शेख,सै मुजाहिद, शाहिद खान,प्रा शेख ,अशरफ पुंजानी, कलीम खान,इरफान मिर्झा,वसीम खान,आबीद अहेमद,सलीम शेख,रहीम खान,काजी मुदस्सीर आदी उपस्थित होते.
0 Comments