कारंजा : गेल्या संपूर्ण पंधरवाड्यात कारंजा येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाद्वारे संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावखेड्यात आणि वस्तिवाड्यावर जाऊन, आत्मनिर्भर किसान अभियान यात्रेचे आयोजन करून ठिकठिकाणी शेतकरी हा आत्मनिर्भर व्हावा . स्वावलंबी व्हावा . यासाठी जनजागृती करण्यात आली . ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
कारंजा तालुक्यातील जवळपास प्रत्येक खेड्यात पोहचण्याचा ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाने प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झाले . यावेळी शाश्वत योगिक नैसार्गिक शेती आज काळाची गरज असून या पद्धतीचा जास्तित जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा . उच्च दर्जा, उच्च गुणवत्ता, जास्त उत्पादन, शून्य लागत, विष मुक्त शेती, कर्ज चिंतामुक्त शेतकरी, आत्महत्या - संकटांपासून मुक्ती करता मार्गदर्शन करण्यात आले .
एक देशी गाय शेती समृद्ध करीत असल्याचे महत्व पटवून देत रासायनिक खताऐवजी शेणखत जैवीक खताचा वापर करण्याची गरज असल्याचे महत्व पटवून देत पशु पक्षी वृक्ष पाणी पर्यावरण शेतीला पोषक बनवित असल्याचे कारंजा येथील ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या केन्द्रप्रमुख - ब्रम्हाकुमारी मालती बहन, ब्रम्हकुमारी नयना बहन, ब्रम्हकुमारी रीना बहन ब्रम्हाकुमार प्रदिपभाई वानखडे, ब्रम्हकुमार जितु भाऊ, ब्रम्हकुमार दिलीप भाऊ, ब्रम्हकुमार निखिलभाऊ यांनी कामरगाव, हिवरा लाहे, पोहा, भामदेवी, पिंप्री मोडक, पारवा कोहर, काकडशिवनी, चकवा, मनभा, किन्ही रोकडे, उंबर्डा बाजार इत्यादी खेडोपाडी आत्मनिर्भर शेतकरी अभियान यात्रा काढून शेतकरी व गावकरी यांना पटवून देत १००% आत्मनिर्भर म्हणून जगण्याचा सल्ला दिला . ठिकठिकाणी त्यांना उत्तम असा प्रतिसाद मिळाला व जिल्हा परिषद सदस्य, पं स सदस्य, सरपंच, अधिकारी व पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना ब्रम्हकुमार प्रदिपभाई वानखडे यांनी कळवीले आहे .
0 Comments