Ticker

6/recent/ticker-posts

दोन चिमुकल्या बालकांना त्यांच्या वडीलांचा शोध घेवुन ताब्यात देण्यात पोलिस स्टेशनजवळका येथील निर्भया पथकास यश

मा पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन जनतेला जलद, गुणवत्ता पूर्ण सेवा मिळावी या करीता डायल ११२ किस्म निर्भया पथक, क्युआर कोड स्कॉलिंग इत्यादी नवनवीन उपक्रम व योजनांची सुरवात केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक पोलिस स्टेशनला निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.
आज दिनांक २५/०५/२०२२ रोजी सकाळी ११/०० वाजता पोस्टे अडळका येथील निर्भया पथक कर्तव्यावर असलेल्या महीला पोलिस अमलदार शितल सरनाईक ब.न. ११७४ या गस्ती वर असताना त्यांनी नियमीत पणे रेल्वे स्टेशन जळका येथे भेट दिली असता त्या ठिकाणी त्यांना दोन मुले साहील व आदी असे अनुकमे ८ व ६ वर्ष वयाचे बालक त्यांचे आईवडील सोबत नसलेल्या अवस्थेत मिळून आले. महीला पोलिस अमलदार शितल सरनाईक यांनी काळजी पोटी सदर मुलांकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि त्याचे वडील सखाराम जाधव हे आम्हाला सोडून बरयाच वेळापासुन गावात गेलेले असुन आम्ही त्यांची वाट पाहत आहोत सदर बालक हे एकटे असल्याने त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना पोहोचविणे आवश्यक असल्याने शितल सरनाईक यांनी पोस्टे जठळका येथील ईतर अधिकारी व अमलदार तसेच पोलिस पाटील विजय सरोदे यांच्या मदतीने मुलांचे वडील सखाराम श्रेणा जाधव रा धोत्रा जि. हिंगोली व बरदरी येथील नातेवाईक दिलीप लक्ष्मण राठोड यांचा शोध घेवुन त्यांना पोस्टेला बोलावून घेवून दोन्ही बालकांना त्यांचे वडील व नातेवाईक यांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले. अश्या पद्धतीने सामाजिक जाणीव व लहान मुलांच्या काळजी पोटी निर्भया पथकाने वेळीच दखल घेतल्याने दोन चिमुकल्या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यश मिळविले आहे. महीला पोलिस अमलदार शितल सरनाईक यांच्या प्रशंसनिय व कौतुकास्पद कामगिरी निमीत्त जडळका परीसरातील नागरीक यांनी समाधान व्यक्त केले असुन वरीष्ठ अधिकारी यांनी कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी हि मा पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंह साहेब, अप्पर पोलिस अधिक्षक श्री गोरख भामरे साहेब तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जगदीश पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनात -जडळका पोलिस स्टेशन चे सपोनि अजिनाथ मोरे, पोडपनि अमोल गोरे, मपोनाको शितल सरनाईक, मपोका दिपाली डिकरे, पोलिस पाटील विजय सरोदे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments