Ticker

6/recent/ticker-posts

तिचं मंगळसूत्र काढू नका, कुंकू पुसू नका'; अंत्यविधीवेळी रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेतला अन्...

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे. स्त्रियांच्याबाबतीत समाजात पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी निव्वळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करणे किती महत्त्वाचे असते, हे या फेसबुक पोस्टमधून दिसून येत आहे. रूपाली चाकणकर यांच्या काकांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीवेळी घडलेला एक प्रसंग रूपाली चाकणकर  यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहला आहे. ही फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेकजण रुपाली चाकणकर यांच्या कृतीचे कौतूक करत आहेत.

रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या काकांच्या अंत्यविधीवेळी जुनाट प्रथांना मुठमाती दिली. पती वारल्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे काहीजण चाकणकर यांच्या काकूच्या गळ्यातील मंगळसूत्र काढत होते. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी त्यांना थांबवले. त्यांनी अंत्यविधीमध्ये काही बदल सुचवले. या प्रथांमुळे पतीच्या निधनामुळे अगोदरच दु:खात असलेल्या महिलेला आणखी त्रास होतो. त्यामुळे आपण या विधींमध्ये बदल करूयात, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनीही त्याला तात्काळ होकार दिला. त्यामुळेच सध्या रुपाली चाकणकर यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

पुरोगामी महाराष्ट्राचे पुढचे पाऊल..! 
अत्यंत सुधारणावादी ऐतिहासिक निर्णय.. 
विधवा प्रथेविरुद्ध सर्व ग्रामपंचायतीने ठराव करावेत असा शासन निर्णय  झाला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने मनपूर्वक अभिनंदन! 
महा यज्ञाच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून विदर्भातून यश येताना दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे रूपालीताई चाकणकर यांनी सुद्धा या विधवा प्रथेविरुद्ध 
 महायज्ञात सहभाग घेतला आहे.

Post a Comment

0 Comments